प्रतिनिधी/ बेळगाव
कारवार येथील चेतना कोलवेकर हिने युवा संसद राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील युवा संसदेसाठी निवड झाली आहे. चेतना हिला संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करण्याची संधी मिळाली.
युवजन व क्रीडा खाते, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय युवा संसद यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ठेवण्यात आली. यामध्ये देशभरातून दोन लाख स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून उपांत्य फेरीसाठी 80 जणांची व अंतिम फेरीसाठी 28 जणांची निवड करण्यात आली, ज्यांना सेंट्रल हॉलमध्ये भाषण करण्याची संधी देण्यात आली.
चेतना हिने ‘शेअर्ड फ्युचर यूथ इन डेमोक्रसी अँड गव्हर्नन्स’ या विषयावर भाषण केले. चेतना मूळची कारवारची असून बीएच्या अंतिम वर्षात शिकत आहे. बेळगावचे उद्योजक व नेतलकर किचनवेअरचे संचालक रत्नाकर नेतलकर यांची ती नात आहे.