शंकरगौडा पाटील यांचे विश्वकर्मा समाजाला आवाहन
बेळगाव : बेळगाव विश्वकर्मा समाजाच्यावतीने गुरुवारी भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, माजी आमदार नरेंद्र बाबू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शंकरगौडा पाटील म्हणाले, देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच सर्वाधिक झाला. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शेट्टर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विश्वकर्मा समाजाचे माजी राज्याध्यक्ष बाबू पत्तार, संतोष पत्तार, माजी बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, मदनकुमार भैरप्पन्नवर, उमेश पत्तार यासह इतर उपस्थित होते.









