अपहरणप्रकरणी एकाला अटक
प्रतिनिधी/ फेंड़ा
फोंडा शहरातील भोळ्या भाबड्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात दाखवून गंडविणाऱ्या एका अस्सल भामट्याच्या मुसक्या आवळण्याची चमकदार कामगिरी फोंडा पोलिसांनी बजावली आहे. म्हापसा येथील एक वृद्ध महिलेचा मोबाईल फोन चोरी व तिचे अपहरणप्रकरणी सनी राजू नाईक (35, सावरभाट-बोरी) याला काल शनिवारी अटक करण्यात आली आहे. कोपरवाडा कुर्टी येथे मैदानावर खेळणाऱ्या युवकांनी दाखविलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला. सदर घटना 26 मार्च रोजी घडली होती.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा येथील 79 वर्षीय ज्येष्ठ महिला फोंड्यात एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी फोंड्यात आली होती. तीला एकटी हेरून संशयित सनीने तिच्याशी गोड बोलून तिला नियोजित स्थानावर नेऊन सोडण्यासाठी आपल्या जीए 05 एच 7529 दुचाकीवर पाठीमागे बसविले. यावेळी त्या महिलेचा फोन वाजला तो सनीने हिसकावून घेत बंद करून आपल्या खिशात घातला. तिला निर्जनस्थळावर नेऊन तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा संशयिताचा बेत होता.
युवकांनी दाखविलेल्या धाडसामुळे भामटा पोलिसांच्या घेऱ्यात
मात्र निर्जनस्थळ गाठण्यासाठी कोपरवाडा कुर्टी रस्त्यावरून जाताना मैदानावर खेळत असलेल्या मुलांना पाहून घाबरलेली महिला मदतीसाठी ओरडली. कोणीतरी वृद्ध महिलेचे अपरहरण करीत असल्याचा संशय त्या मुलांना आला. एका दुचाकीसह युवकांनी त्याचा पाठलाग केला तसेच त्याचा पाठिमागून मोबाईलवरून व्हीडीओ चित्रिकरण केले. त्याला पाठलाग करीत असताना व्हीडीओ सर्वत्र व्हायरल करणार असा संदेशही दिला. या घटनेने भयभीत झालेल्या संशयिताने त्या वृद्ध महिलेला कोपरवाडा कुर्टी हून फोंडा शहर रस्ता धरला, फोंडा तिस्क येथे सोडून तो मडगांवच्या दिशेने फरार झाला.
मोबाईल फोन चोरी व अपहरणप्रकरणी संशयिताला अटक
याप्रकरणी पिडीत महिलेने फोंडा पोलीस स्थानकात आपल्या अपहरण व मोबाईल फोन चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यास पोलीसांनी सुरूवात केली. काल शनिवारी तो फोंडा पोलिसांच्या हाती लागला. संशयिताविरोधात भां दं. सं. 379,356, 365 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. फेंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर, सहाय्यक उपनिरीक्षक महेश गावकर, हवालदार









