बेळगाव – पेंशन घेण्यासाठी जात असलेल्या वृद्ध महिलेला कारने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना कोप्पळ जिल्हातील कारटगी तालुक्यातील मैलापूर क्रॉस जवळ घडली आहे. कनकगिरीचे आमदार बसवराज दडेसगुरु यांच्या कारने दिलेल्या धडकेत मरियम्मा नायक (वय – ७०) यांचा मृत्यू झाला. कारने कुत्र्याला वाचविण्यासाठी जाऊन ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातनंतर वृद्ध महिलेला उपचारासाठी बळ्ळारीच्या विम्स इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कारटगी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









