आचरा प्रतिनिधी
किर्लोस आंबवणे येथील दत्ताराम शिवाजी लाड वय 81 हे वृध्द राहत्या घरातून गुरुवारी दि 13 पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा नितीन लाड यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.दि 13 रोजी घरात कोणालाही न सांगता दत्ताराम शिवाजी लाड हे घरातून निघून गेले होते . उशीरापर्यंत घरी न परतल्याने घरातील नातेवाईकांनी त्यांची गावात, नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध चालू केली. मात्र आढळून न आल्याने त्यांचा मुलगा नितीन लाड यांनी आचरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. हे वृध्द दिसून आल्यास आचरा ठाण्यात कळवण्याचे आवाहन आचरा पोलिसांनी केले आहे.









