चिपळूण :
तालुक्यातील वालोपे येथे गुरुवारी सकाळी 9.35 वाजता आयशर टेम्पोची धडक बसून वृद्ध ठार झाला. या प्रकरणी चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर नारायण गोरीवले (वालोपे–वरचीवाडी) असे ठार झालेल्याचे तर नामदेव गोविंद गायकवाड (कोलाड–रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. गोरीवले हे गुरुवारी सकाळी एकादशीनिमित्त झोलाई मंदिर येथे निघाले असताना नामदेव हा आपल्या ताब्यातील टेम्पो मागे घेत असताना त्यांना धडक बसली. यात मधुकर गोरीवले ठार झाले. याची फिर्याद त्यांचा मुलगा सचिन गोरीवले याने दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








