रत्नागिरी :
मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचा बनाव करून वृद्धाला तब्बल 61 लाख 19 हजार 80 ऊपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या संशयिताला पोलिसांनी दिल्ली येथून अटक केल़ी राजीव विश्वनाथ तिवारी (47, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी
संशयित आरोपीने तक्रारदाराला मोबाईलवर फोन करून पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या नावावर कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आल्याचे सांगितल़े या खात्यातून दोन कोटी ऊपयांचा मनी लॉड्रिंग व्यवहार झाल्याचे सांगत, खात्यात रक्कम जमा करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल़ी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होत़ा त्यानुसार भारतीय दंड संहिता 2023 मधील कलम 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66 (सी) आणि 66(ड) अन्वये गुन्हा दाखल आहे.
पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण व बँक व्यवहारांची कसून तपासणी केल्यानंतर संशयित आरोपी दिल्ली येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल लोकेशन उपलब्ध नसतानाही स्थानिक बातमीदारांच्या मदतीने त्याला शोधून काढण्यात आले. तसेच पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आल़ी गुह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, हवालदार रामचंद्र वडार, रोहन कदम, रामदास पिसे, संदीप नाईक, रमिज शेख यांनी केल़ा








