रत्नागिरी :
तालुक्यातील साठरेबांबर येथे आंब्याच्या झाडावऊन पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा शिवाजी बाळका ठोंबरे (74, ऱा ठोंबरेवाडी, साठरेबांबर, रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े शिवाजी ठोंबरे यांना प्रथम रत्नागिरी जिल्हा शासकीय ऊग्णालय येथे दाखल करण्यात आले होत़े त्यानंतर पुढील उपचारासाठी केईएम ऊग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले हेत़े 20 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 च्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.








