डोक्यात दगड घालून केली हत्या
कोल्हापूर प्रतिनिधी
किरकोळ कारणातून वृद्ध महिलेचा डोक्यात दगड घालून तसेच भिंतीवर डोके आपटून निर्घृण खून केला.लक्ष्मी विलास क्षीरसागर ( वय 70 रा रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी भिंतीवर रक्ताचे डाग उडाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दगड, चप्पल आणि दागिने जप्त केले आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास सुरु आहे.









