ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते. बेईमानी आणि गद्दारीची बिजे गेल्या साडेतीन वर्षापासून रूजवली जात होती, असा गौप्यस्फोट खा. संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये गद्दारीची बिजे रुजत होती. त्यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न होता. हे सगळे त्यावेळी अहमद पटेल यांना भेटून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. त्यांच्या अनेक बैठकाही झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची ही बेईमानी नवीन नाही. सध्या राज्यात अवकाळीने थैमान घातलं आहे. शेतमालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
अधिक वाचा : राहुल गांधी देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासत आहेत