राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्य़ानंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे-भाजप सरकार हे सहा महिन्यापेक्षा जादा टिकणार नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र हि माहिती खोटी असून यावर विश्वास ठेवू नका असं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून एकामागून एक ट्विस्ट समोर येत असतानाच आता मुख्य़मंत्र्यांच्या ट्विटने राजकारणात आणखी नवा ट्विस्ट काय असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
ट्विट करत काय म्हणाले मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही. या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
हेही वाचा- पूरस्थितीवर मात करण्यासाठी युतीचं सरकार कामाला लागलं; शंभूराजे देसाई
हेही वाचा- Sangli; जिल्ह्याच्या नशिबात असेल तर मंत्रीपद नक्की मिळेल- आ. अनिल बाबर
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








