आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागे घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा धक्का दिला आहे. यामुळे आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी मेट्रो होऊ नये म्हणून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह पर्यावरप्रेमींनी आणि संघटनांनी आंदोलन केलं होत. मात्र याकडे दुर्लक्ष करत आज मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. मुंबई मेट्रो-३ चं कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं सांगितलं आहे.
राज्यात युतीचं सरकार येताच महत्त्वपूर्ण योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये जलयुक्त शिवार, आरेतील मेट्रो प्रकल्प असे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान गेल्या तीन वर्षापासून आरे प्रकल्प लांबणीवर पडला होता. ईगोचा इशू मविआ करत आहे असा आरोप भाजप करत होते. त्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे. मात्र येत्या दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे महायुती सरकारनं सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा असा प्रयत्न जरी होत असला तरी काही संघटना आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Previous Articleमंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, मुख्यसूत्रधार रियाज कोल्हापूरचा
Next Article उपनगरांचा विस्तार वाढला, पण सुविधांची वाणवा








