Budget 2023 : देशाला,राज्याला चालना देणारा अर्थसंकल्प आहे.सर्वसमावेशक समाजातील इतर घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे.पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे.शहरी, ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. गरीबांना 2024 पर्यंत मोफत रेशन देण्याचा केंद्राचा निर्णय आहे.गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. विरोधीपक्षांनी या बजेटचे स्वागत केले पाहिजे. या बजेटमध्ये सर्व बाबींचा विचार केला आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानलं आहे. प्रत्येक घटकाला ग्रहीत धरून योजना सादर केल्या आहेत. कोणत्याही बजेटमध्ये एवढी तरतूद केली नव्हती पण या बजेटमध्ये याचा विचार केला आहे,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यांनी अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केले.
निर्मला सीतारामन यांनी कर कपातीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या. आता ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. एवढेच नाही तर निर्मला सीतारामन यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली. महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलीयाशिवाय शेतकरी, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प कसा असेल. निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पातळीवर मोठ्या घोषणा केल्या.
Previous Articleमाजगावातील महिलांना गारमेंट उद्योगाबाबत मार्गदर्शन
Next Article मालवणात रस्ता डांबरीकरणासाठी निवेदन









