शरद पवार यांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेले दिपक केसरकर यांनी अंबाबाईच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधला.
पहा VIDEO >>>> एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री- मंत्री दिपक केसरकर
उद्धव ठाकरेंवर भाष्य करताना ते म्हणाले, “मुऴात उद्धव ठाकरे यांनीच ठरवले होतं कि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर दबाव आणल्यामुळेच ठाकरे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मनातीलच मुख्यमंत्री असल्याने त्यांना वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले, “उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे ऐतिहासिक संबंध आहे. ज्या प्रमाणे मुंबईत उत्तरप्रदेश भवन बांधलेले आहे. त्याचप्रमाणे आयोध्येत सुद्धा महाराष्ट्र भवन बांधण्यात यावं ज्यामुळे मराठी माणसाची सोय होईल अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.”
शेवटी त्यांनी, “स्वत: पंतप्रधान मोदी यांनी सांगूनही उद्धव ठाकरे आले नाहीत. तसेच मोदी साहेबांना दिलेले वचनही त्यांनी मोडले आहे. मी स्वत: या गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यामुळे या गोष्टी वरच्या पातळीवर ठरवल्या जातील. शेवटी मोठ्या भावाने लहान भावाला माफ केले पाहिजे. सरकारशी कसे जुऴवून घ्यायचे हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावे.”