रत्नागिरी :
विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या महाविजयाचे खरेखुरे शिल्पकार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि हे कुणीच नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी येथील आभार यात्रेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार नीलेश राणे उपस्थित होते.








