ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. ही घटना ताजी असताना आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंविषयी (Supriya Sule) गलिच्छ भाषा वापरली आहे. सत्तारांच्या अभद्र भाषेवरून महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. स्तरांच्या या वक्तव्यांनंतर राष्ट्रवादीनेही सत्तारांना माफी मागण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. तर आता राज्यभरात सत्तारांविरोधात राष्टवादीचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तर मुंबईत सत्तारांच्या घरासमोर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आला. यावेळी आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी दगडफेक करत मोडतोड केली. तसेच विद्या चव्हाण यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. (shinde group mla abdul sattars tongue slipped npc mp supriya sule criticize offensive language)
सुप्रिया सुळेंनी अलीकडे अब्दुल सत्तारांना ५० खोके मिळाले का, असा प्रश्न केला होता, ज्यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का? असा प्रतिप्रश्न केला. सत्तारांच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुमच्याकडे ५० खोके असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका पुन्हा केली. ज्यावर आज सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंना शिवागाळ करत तुम्हालाही देऊ असे उत्तर दिले. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच खवळले आहे, विरोधकांकडून सत्तारांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर राज्यात ठीक ठिकाणी आंदोल केलं जात असून मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत बंगल्याच्या काचा फोडल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतलं.
हे ही वाचा : ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ; ठाकरे गटाच्या नेत्याची माहिती
दरम्यान अब्दुल सत्तार हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. सत्तारांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव खतगावकर यांनी अलीकडेच शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली होती, याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनाही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद उफाळून आला होता.
मात्र शिंदे गटातील आमदारांपैकी वादग्रस्त वक्तव्य करणारे अब्दुल सत्तार एकटेच नाहीत. अलीकडेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा नटी असा उल्लेख केला होता. तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हेही अनेकदा वादात सापडले आहेत. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन तीन महिनेच झाले असताना त्यांचे मंत्रीच आता अडचणीत वाढ करत आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.