पुणे: राज्य सरकार अतिशय चांगले काम करीत असून, अनेक चांगले निर्णय आम्ही घेतले आहेत. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार ही होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज पाच जिल्ह्यांतील पूरस्थितीची आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवरही त्यांनी भाष्य केले.
यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना दिलासा दिला. पेट्रोल डिझेल स्वस्त केले. विजेचे दर कमी केले. सरकार उत्तम काम करीत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारही होईल. पाचही जिल्ह्यातील अतिवृष्टी, पिकस्थितीचा आज आढावा घेतला. ज्या जिल्ह्यातील कामे रखडली आहेत, त्या कामांना गती मिळावी, याकरिता ही बैठक घेतली. लोकांची कामे झाली पाहिजेत व ती दर्जेदार व्हावीत त्या दृष्टीने सकारात्मक विचार करू असे ही ते म्हणाले.
हेही वाचा- गद्दारांना माफी नाही; जयसिंगपूरात आदित्य ठाकरे गरजले
संजय राऊत यांच्या घरात ईडीला सापडलेल्या रोख रकमेपैकी बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव लिहिल्याचं आढळून आलं होतं. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, पैसे कुणाच्या घरी मिळाले? माझ्या नाहीत. ज्यांच्या घरी मिळाले, त्यांनाच काय ते विचारा, असे उत्तर देत स्पष्टीकरण दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








