ठाकरे बंधुंच्या होवू घातलेल्या मनोमीलनावर विविध राजकीय नेत्यांच्या सगळ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या
पाचगणी : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरलं आहे ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याबाबत केलेली विधाने. एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा इगो पाहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा सुरु झालीय. यावर प्रतिक्रिया देताना मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पत्रकारांना ढकलत ‘जाऊ दे यार, काय करता कामाचं बोला असं म्हंटलं.
ठाकरे बंधुंच्या होवू घातलेल्या मनोमीलनावर विविध राजकीय नेत्यांच्या या सगळ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देणे टाळले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे गावी आहेत. यावेळी पत्रकारांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसासाठी दरे या गावी मुक्कामी आले होते.
अन् शिंदे पुन्हा कामात व्यस्त
या सर्व प्रकारामुळे घटनास्थळावरील वातावरण चांगलंच कमालीचं धीरगंभीर झालं होतं. पत्रकाराच्या माईकला झिडकारून राज– उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्ते आणि इतर अधिकारी वर्ग देखील शिंदे यांचा राग पाहिल्यानंतर आता पुढे नेमकं काय होते याची चिंता त्यांना देखील वाटली होती. मात्र तत्काळ रागात येऊन शांत होणारे ते एकनाथ शिंदे आपल्या कामात पुन्हा एकदा व्यस्त असताना ते दिसून आले. मात्र या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात राज आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र करण्याच्या चर्चेवर वेगवेगळ्या नेते मंडळी प्रतिक्रिया देत असतानाच मात्र एकनाथ शिंदे यांना या एकत्रीकरणाचा राग का आला याबाबत आता उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे.
तसेच याच पॉईंटवर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच पुढे पोवई नाक्याकडे येताना तसेच खड्डे पडलेले दिसतात. त्याचबरोबर पोवई नाक्याकडून गोडोली नाक्याकडे जाताना वायसी कॉलेजच्या समोर असलेल्या ओढ्याच्या पुलावर खड्डा पडला आहे. पुलच खचला आहे. गतवर्षी हा प्रकार निदर्शनास आला होता. बांधकाम विभागाने अद्यापही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. प्रशासनाचे डोळे कधी उघडणार ज्यांनी अजिंक्यतारा रस्त्याच्या कामासाठी लोटांगण घातले होते ते सामाजिक कार्यकर्ते अमोल खोपडे यांनी डॉ. पेंढारकर हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरता पुन्हा दंडवत घातले आहेत. प्रशासनाने डोळे उघडावेत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा दिला आहे.








