Eknath Shinde : महसुली आणि इतर निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी केली.मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जालनामध्ये उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांना कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती.त्यांच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की,ज्यांच्याकडे नोंदी असतील त्यांना दाखले दिले जातील असा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या नोंदीची पडताळणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर अधिकारी अशी पाच सदस्यांची समिती गठीत केली असल्याचेही शिंदे म्हणाले. महसुली आणि इतर निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी दाखला द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत होती, त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटलयं.