कोल्हापूर : कोल्हापूर खंडपीठ प्रश्न गेल्या 30 वर्षी पासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सहा जिल्ह्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून तो तातडीने मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर या प्रश्नांची आपणास पूर्ण माहिती असून लवकरच या बाबत बैठक घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी खंडपीठ कृती समितीने त्यांची विमानतळावर भेट घेतली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवडे, माजी आमदार अमल महाडिक, उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर, महापालिका प्रशासक कदंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते. महाराष्ट्र गोवा बार कॅन्सिल सदस्य विवेक घाटगे, बार असोसिशनचे अध्यक्ष गिरीश खडके, सचिव विजय ताटे देशमुख, माजी अध्यक्ष महादेवराव अडगुळे, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








