Eknath Shinde : आज जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आंबेडकर अनुयायी साजरी करत आहेत. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ही बाबसाहेबांची शिकवण आहे. या त्यांच्या शिकवणीनुसार बार्टीतील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून काल बार्टीतील 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला.बार्टीचे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जगाला हेवा वाटेल अस जागतिक दर्जाच बाबासाहेब आंबेडकर यांच स्मारक इंदु मिल येथे उभं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज आकस्मित मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या मदत वाटप कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी लाँगमार्चवेळी मृत्यू झालेला शेतकरी पुंडलिक जाधव यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांचा धनादेश देऊन मदत केली.
यावळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या 8 ते 9 महिन्यात 50 कोटी या सरकारने खर्च केले आहे. जे गेल्या अडीच वर्षात मागील सरकराले जमले नाही. 50 खोके म्हणणाऱ्यांना हे उत्तर आहे. 6442 रूग्णांचे जीव वाचवण्याचे काम आमच्या सरकारनं केलं आहे. गोरगरीबांना महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत. परंतु हे सरकार गोर-गरीबांच आहे. संवेदनशील अस हे सरकार आहे. म्हणूनच आम्ही अशाच प्रकारे मदत करत राहणार असल्याचेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








