Buldhana News : “मी भाजपात जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. ते बुलढाण्यात (Buldhana) बोलत होते.यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
एकनाथ खडसे म्हणाले, एकेकाळी भाजपचे दोन खासदार असताना भाजपला हिणवलं जायचं. त्यावेळी आम्ही मोठ्या मेहनतीने पक्ष वाढवला. तर बनिया, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांच्यामुळे बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








