वृत्तसंस्था / भुवनेश्वर
ओडिशा राज्यातील जलतरणपटू प्रत्याशा रे हिची 2024 सालातील प्रतिष्ठेच्या एकलव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
चालु वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रत्याशाने 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कास्य अशी एकूण 6 पदके मिळविली आहेत. एकलव्य पुरस्कार निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवड सदस्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रत्याशा रे हिची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. ओडीशाची जलतरणपटू प्रत्याशा रे ला आता रोख 7 लाख रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. एकलव्य पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. या वितरण समारंभावेळी दोंडापती जयराम आणि बॅडमिंटनपटू तन्वी पत्री यांचाही गौरव केला जाणार आहे.









