मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज होणार वितरण
पणजी : शिक्षक हा ज्ञानार्जनातील महत्त्वाचा दुवा आणि पाया आहे. शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, आदर्श शिक्षक घडावेत यासाठी उत्कृष्ट शिक्षकांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री वशिष्ट गुरू’ पुरस्कारासाठी यंदा राज्यातील 8 शिक्षक पात्र ठरले आहेत. या आठही शिक्षकांना आज मंगळवारी 5 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्काराचे मानकरी शिक्षक
मुख्याध्यापिका नीता साळुंखे (एल. डी. सामंत मेमोरियल माध्यमिक विद्यालय, पर्वरी), आंतोनेत डिसोझा (आवर लेडी ऑफ रोझरी माध्यमिक विद्यालय, दोना पावला), मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई (पॉप्युलर माध्यमिक विद्यालय, कोंब मडगाव), हर्षिता नाईक (सरकारी प्राथमिक शाळा, चोनसाई-पार्से), सोनिया माणगावकर (ए. व्ही. लॉरेन्स सरकारी प्राथमिक शाळा, मडगाव), उमेशी सावळ-फळदेसाई (सरकारी माध्यमिक विद्यालय, केपे-फातर्पा), दत्ता परब (श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, पीर्ण-बार्देश), सर्वण-डिचोली येथील केशव सेवा साधनातर्फे विशेष विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या नारायण झांट्यो माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रेमानंद नाईक यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली.









