गांधीनगर :
गुजरातमधील गांधीनगर जिह्यात मेश्वो नदीत आंघोळ करताना आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृत हे देहगाम तालुक्मयातील वसना सोगठी गावचे रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण गणेश विसर्जनासाठी गेले होते. जवळच चेक डॅम बांधण्यात आल्याने या लोकांना नदीच्या खोलीचा अंदाज आला नाही. अचानक पाणी वाढल्याने ही दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी सर्व 8 मृतदेह सापडल्यानंतर बचावकार्य थांबवण्यात आले. गेल्या सहा दिवसांत गणेश विसर्जनावेळी घडलेली ही चौथी घटना असून त्यामध्ये एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे.









