प्रतिनिधी/ पणजी
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यंाकडे मोबाईल पोहचतात तरी कसे, असा प्रश्न तुरुंग अधिकाऱ्यांना पडला आहे. कडेकोट बंदोबस्त असतानाही प्रत्येकवेळी तुरुंगात छापा मारला की मोबाईल, गांजा तसेच अन्य अमलीपदार्थ सापडत असतात. काल शनिवारी गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तुरुंगात छापा टाकला असता 8 मोबाईल, काही प्रमाणात गांजा तसेच अन्य वस्तू जप्त केल्या आहेत.
तुरुंगात मोबाईलचा वापर होत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळताच त्यांनी नियोजनबद्ध कारवाई केली. ही कारवाई गुन्हा शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत गुन्हा शाखेचे उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक तसेच तुरुंग महानिरीक्षक उपस्थित होते. सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत तपासकाम सुऊ होते.
तुऊंगात कित्येकवेळा छापा टाकण्यात आला असून प्रत्येकवेळी मोबाईल सापडले आहेत. तुऊंगातील कैदी तुऊंगाबाहेरील आपला व्यवहार मोबाईलद्वारे हाताळत असतात. हा प्रकार अनेकवेळा उघड झाला. तसेच कैदी तुऊंगात असतानाही कैद्याला गांजा, सिगारेट, तंबाखू तसेच अन्य अमलीपदार्थ सहज उपलब्ध होत असतात. या साऱ्या प्रकारामुळे तुऊंगाच्या सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.









