वृत्तसंस्था /हैदराबाद
तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) पक्षाच्या आठ सदस्यांना पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील चेरला मंडलातील तिप्पापुरम जंगल परिसरात पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान छत्तीसगडमधील आठ जणांना बुधवारी अटक करण्यात आली. ते गेल्या दोन वर्षांपासून सीपीआय (माओवादी) पक्षासाठी काम करत आहेत. या आठ माओवाद्यांनी इतरांच्या सहकार्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी गेल्यावषी जुलैमध्ये चेर्ला मंडलमधील दोन गावांमध्ये बीटी रोडखाली 12 किलो वजनाची भूसुऊंग पेरली होती. त्यांच्याविऊद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटक कायदा आणि आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









