तीन महिलांचा समावेश, घरे-दुकानांचेही नुकसान
► वृत्तसंस्था/ कृष्णगिरी
तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात एका फटाक्मयांच्या केंद्रामध्ये भीषण स्फोट झाला. या अपघातात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कृष्णगिरी जिल्ह्यातील पझायापेट्टई येथील फटाके उत्पादक गोदामात अचानक झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. स्फोटामुळे युनिटजवळील घरे आणि काही दुकानांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच बाधितांना वाचवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते.

पझायापेट्टई भागात रवी नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग आजूबाजूच्या दुकाने आणि घरांमध्येही पसरली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केल्यानंतर सात जणांना मृत घोषित करण्यात आले. तर काही जखमींना उपचारासाठी जवळच्या सरकारी ऊग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऊग्णालयात पाठवण्यात आल्याचे कृष्णगिरीचे पोलीस अधीक्षक सरोज कुमार ठाकूर यांनी सांगितले. याआधी मंगळवारी विऊधुनगर जिह्यातील शिवकाशी शहरात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले होते.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून शोकभावना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कृष्णगिरी येथील फटाका कारखान्यात झालेल्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. हा अपघात दु:खद असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.









