कवठेमहांकाळ :
गेल्या अनेक दिवसापासून बोरगाव, मळणगाव, शिरढोण, अलकुड (एम) व नरसिंहगाव या पाच गावांना विजेचा मोठा प्रश्र भेडसावत होता. या समस्येची दखल घेऊन पंतप्रधान मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेतून आता दिवसा शेतीसाठी आठ तास बीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा महावितरणच्या संचालक व प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा नीताताई केळकर यांनी केली.
तासगाव-कवठेमहांकाळ सीमेवर ५० एकरात उभारलेल्या सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नीतीताई केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
केळकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचे प्रश्र सोडवणारे नेते आहेत. बीजेअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना रात्रीअपरात्री पाणी देण्याची वेळ येऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना बीज कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही केळकर यांनी दिली.
जत आणि कवठेमहांकाळ मध्ये १९ सौरउर्जा प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यापैकी पाच प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच गावांना आता दिवसा आठ तास बीजपुरवठा केल्याने सुमारे तीन हजार शेतकऱ्यांना या बिजेचा फायदा होणार आहे, असे भाजपचे सरचिटणीस मिलिंद कोरे यांनी सांगितले.
सौरउर्जा प्रकल्पाची महावितरणचे कार्यकारी अभियंता शिंदे, उपअभियंता शिकलगार यांनी माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाला विकास भोसले, विजय शेजाळ, रविंद्र गाडवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.








