प्रतिनिधी/ बेळगाव
बसवनकुडची (ता. बेळगाव) येथील तलावानजीक अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बसवनकुडची येथे अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 8 हजार 200 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आठ जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









