चेन्नई / वृत्तसंस्था
तामिळनाडूतील थेनी जिह्यात शबरीमाला येथून भाविकांना घेऊन जाणारी कार 40 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले. अंदिपट्टीजवळील संमुगसुंदरपुरम गावातील रहिवासी असलेला अयप्पा भक्त शबरीमालाला भेट दिल्यानंतर घरी परतत असताना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली. कुमुली पर्वतीय मार्गावरील इराइचलपलेमजवळ भाविकांची कार 40 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधून प्रवास करणाऱया 9 वर्षीय मुलासह केवळ दोघांचे प्राण वाचले आहेत. दोघांवरही इस्पितळात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.









