वृत्तसंस्था/ दुबई
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी आठ संघ पात्र ठरले असून विशेष म्हणजे वेस्ट इंडीज व लंका या संघांना या स्पर्धेसाठी पात्रता मिळविता आली नाही.
पाक संघ यजमान असल्याने हा संघ आपोआपच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अन्य सात संघ 2023 मधील वनडे विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीनुसार निश्चित झाले आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठमध्ये स्थान मिळविणाऱ्या संघांना पात्रता मिळते. पात्र ठरलेल्या संघात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड, भारत, बांगलादेश, न्यूझीलंड, द.आफ्रिका यांचा समावेश आहे. वर्ल्ड कपमधील प्रभावी कामगिरीमुळे अफगाण संघाला या स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली आहे. विंडीज, लंका, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, आयर्लंड यांना मात्र पात्रता मिळविता आली नसल्याने ते या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. 2023 वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविण्यात ते अपयशी ठरले होते. त्यामुळेच ते या स्पर्धेच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले हेते.









