दोडामार्ग- विजघर राज्यमार्गावरील घटना
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
दोडामार्ग- विजघर राज्यमार्गावरील आवाडे वेळपय नाल्यानजीक मालवाहतूक आयशर टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला कलंडली. हा अपघात गुरुवारी पहाटे झाला.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी गोव्यातील आयशर मालवाहतूक गाडी( जीए 04 टी 4708) गुरुवारी पहाटे दरम्यान आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात चालकाच्या बाजूने कलंडली. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुखरूप असल्याचे स्थानिकांनी सांगितले.अपघातग्रस्त गाडी रिकामी असल्याने गाडीच्या नुकसानीशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.हा अपघात पहाटेच झाला. अपघातानंतर उशिरापर्यंत ही गाडी घटनास्थळावरून हलविण्यात आली नव्हती. त्यामुळे नेमकी गाडी कुठे जात होती , आयशर टेम्पोचा मालक कोण याबाबत माहिती प्राप्त झाली नाही.









