Egypt Church Fire : इजिप्त मध्ये चर्चला भीषण आग लागली. यात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तमधील कॉप्टिक चर्च (Coptic Church) ने दिलेल्या माहितीनुसार, कैरो येथील चर्चला आग लागल्याने किमान 41 लोक ठार आणि 14 जखमी झाले आहेत. आगीचे कारण कळू शकले नाही. अशी माहिती पीटीआयने दिली आहे.
इजिप्तमध्ये अलिकडच्या वर्षांत अनेक मोठ्या आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मार्च 2021 मध्ये, कैरोच्या पूर्व उपनगरातील एका कपड्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत किमान 20 लोकांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये, दोन रुग्णलयात लागलेल्या आगीत 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर आज चर्चला भीषण आग लागल्याने 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हि आग इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निवेदनात म्हटले आहे की, रविवारी सकाळी बैठक सुरू असताना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून, जखमींना रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









