कोल्हापूर :
शासनाने यंदा पोषण आहारामध्ये पर्यायी स्वरूपात अंडा पुलावचा समावेश केला आहे. अंडा पुलावाचे वाटप करणे अडचणीचे ठरत असल्यामुळे शाळास्तरावर पोषण आहारातून अंडी खायला देणेच बंद केले आहे. त्यामुळे मुले सात्विक आहारापासून वंचित राहत आहेत.
त्यामुळे शालेय पोषण आहारामध्ये पुरक आहार म्हणून स्वतंत्रपणे समावेश करून मुलांना अंडी खायला द्यावी, अशी मागणी आता पालकांतून होत आहे.
शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या पत्रानुसार 12 प्रकारच्या पाककृती निश्चित केल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने दि.6 जून रोजी दिलेल्या निर्णयानुसार पोषण आहाराची अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. यातील नऊ पाककृतींचा आराखडा दिवसागीणक ठरवून दिला आहे. मात्र, यामध्ये अंडा पुलाव, गोड खिचडी व नाचणी सत्व या तीन पाककृतींचा पर्यायी स्वरूपात समावेश केला असल्याने याचे वाटपच होत नसल्याचे चित्र आहे.
- अंडा पुलावचा समावेश कशासाठी?
पोषण आहारामध्ये अंडा पुलावाचा पर्यायी स्वरूपात समावेश केला आहे. शाळेत काहीजण अंडी खात नसल्यामुळे अंडा पुलाव वाटताना अडचणी निर्माण होतात. यापूर्वी वादाचे प्रसंगही घडले आहेत. यावर उपाय म्हणून गतवर्षी आहारात अंडा पुलाव रद्द करून स्वतंत्रपणे उकडलेली अंडी दिली गेली होती. त्यामुळे वाटपही सुलभ झाले होते. त्यामुळे स्वतंत्रपणे एक दिवशी ठरवून अंडी द्यावी, अशी मागणी होत आहे. यंदा पुन्हा शासनाने अंडा पुलावचा समावेश करून काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- उकडलेले अंडी खाण्याचे फायदे :
उकडलेलया अंड्यामध्ये भरपुर प्रथिने, व्हिटॅमिन, आणि खनिजांचा समावेश असतो. याच्या सेवनामुळे वजन कमी करणे व डोळ्यांचे आरोग्य सुधारते. यातील प्रथिनांमुळे स्नायूंची वाढ होते. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, बी12, रिबोफ्लेविन, सेलियमसारखे खनिजे असतात. मेंदूच्या कार्य व विकासासाठी उपयुक्त आहे.
- अंडी बंद करण्यामागे अर्थकारण
गतवर्षी सहा महिने मुलांना पूरक आहार म्हणून स्वतंत्रपणे अंडी खायला दिली जात होती. मात्र, याचे बजेट वाढत असल्याने आणि निधी कमी असल्यामुळे अंडी बंद केली असल्याची चर्चा आहे.
- असे आहे पोषण आहार वाटपाचे नियोजन
पाककृतीचे नाव निश्चित केलेला दिवस
व्हेजिटेबल पुलाव : पहिला, तिसरा, पाचवा सोमवार
मसाले भात : दुसरा, चौथा बुधवार
मटार पुलाव : पहिला, तिसरा व पाचवा बुधवार
मूगडाळ खिचडी : रोज
चवळी खिचडी : पहिला, तिसरा, पाचवा गुरूवार
चना पुलाव : पहिला, तिसरा व पाचवा शुक्रवार
सोयाबीन पुलाव : दुसरा व चौथा सोमवार
मसूरी पुलाव : दुसरा व चौथा गुरूवार
मूग, शेवगा वरणभात : पहिला, तिसरा, पाचवा शनिवार
व दुसरा, चौथा शनिवार
मोड आलेल्या मटकीची उसळ : दुसरा व चौथा शुक्रवार
अंडा पुलाव : पर्यायी स्वरूपात
गोड खिचडी : पर्यायी स्वरूपात
नाचणी सत्व : पर्यायी स्वरूपात
- पोषण आहारात अंडींचा समावेश व्हावा
शोलय पोषण आहरातून अंडी बंद करणे चुकीचे आहे. पोषण आहारात पुरक आहार म्हणून अंड्यांचा समावेश करावा. प्रशासनाने विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे आठवड्यातून एकदा उकडलेले अंडे खायला द्यावे.
-पालक
- आवश्यक तिथे अंडी वाटप करू
अंडापुलाव वाटप करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्याऐवजी चिक्की व राजगीरा लाडू वाटप केले जात आहे. शिक्षक व पालकांच्या मागणीनुसार आवश्यक त्या शाळेत अंडी वाटप करण्याचे नियोजन केल जाईल.
-डी. सी. कुंभार, प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ








