Egg Recipes Tips : ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ अस लहानपणापासून आपण एेकत आलो आहोत. अंडी आवडणार नाही अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. अंडी म्हटलं की अंडा करी, बाॅईल अंडी, अंडा फ्राय, अंडा चटणी, हाफ बाॅईल्ड असे अनेक प्रकार आपण खाल्ले असतील. आज आम्ही तुम्हाला थोडी वेगळी अशी अंड्याची रेसीपी सांगणार आहोत तुम्ही चपाती, ब्रेड, भाकरी सोबत देखील खावू शकता. चला तर जाणून घेऊया रेसीपी.
साहित्य
उकडललेली अंडी-6
टोमॅटो-2
बारीक चिरलेला कांदा-2
लाल तिखट -2 चमचे
हिरव्या मिरच्या- 3
धने पावडर-एक चमचा
जिरे पावडर- अर्धा चमचा
पाव चमचा- गरम मसाल
कसुरीमेथी-एक चमचा
आल्ले- दीड इंच
लसून पाकळ्या- 10 ते 12
कोथंबिर
चवीनुसार मीठ
कृती
अंड्यातील बलक बाजूला करून अंड्याचे गोल आकारात काफ करून घ्या. पॅनमध्ये 2 लहान चमचे तेल घालून पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, चवीनुसार मिट, अंड्याचे काफ घालून 2 ते 3 मिनिट परतून घ्या. त्यानंतर कढईत थोड तेल घाला त्यात जिरे घाला. जिरे चांगले तडतडले की त्यात बारीक चिरलेले दोन कांदे घाला. कांदा चांगला परतून घ्या. त्यानंतर दोन टोमॅटो,10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, दिड इंच आल्ले हे मिश्रण मिक्सरला एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण कांदा लालसर भाजला की त्यात घाला.आता दुसरे वाटण तयार करून घ्या. त्यामध्ये 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, एक चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घ्या. सुरवातीला हे सगळे हे मिश्रण पाणी घालून पेस्ट करून घ्या. तयार केलेली मसाला पेस्ट आधीच्या ग्रेव्हित घाला. आता त्यात तीन मिरच्या बारीक चिरून घाला. मसाला चांगला भाजल्यानंतर त्यात अंड्याचे काफ, बलक घाला. सगळे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात अर्धा ग्लास पाणी घाला. त्यात थोडे बटर घाला. आता झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवून घ्या. बारीक चिरलेली कोथंबिर घालून गरमा गरम अंड्याची ही भाजी सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









