कसबा बीड प्रतिनिधी
गुऱ्हाळघरांना दिवसा तसेच सलग बारा तास वीज पुरवठा सुरू करावा यासाठी करवीरचे आमदार श्री.पी. एन.पाटील यांनी पत्रव्यवहार करून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ दिवसा विजपुरवठा सुरु करण्यासंदर्भातले पत्र देण्यात आले. यावेळी गुऱ्हाळ घरांना दिवसा वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार श्री.पी. एन. पाटील यांनी सांगितले.
येत्या काही दिवसातच करवीर पूर्व भागातील सर्व गुऱ्हाळघरे सुरु करण्याच्या घाईत शेतकरी आहेत . त्याची पूर्व तयारीही पूर्ण झाली असून काही दिवसातच सर्व गुऱ्हाळघरे सुरु होतील . सध्या दिवसा व रात्री अशा पद्धतीने विजेचे नियोजन सुरु असून यामुळे गुऱ्हाळघरे सुरू करण्यास मोठ्या अडचणी होत असून रात्रीच्या कामामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या धोका तसेच रस खराब होण्याची शक्यता आहे,यामुळे लवकरच प्रतिवर्षी प्रमाणे दिवसा सलग बारा तास विजपुरवठा सुरू व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या मधून होत आहे त्यानुसार करवीरचे आमदार श्री.पी. एन.पाटील साहेब यांनी करवीरचे महावितरण अधिकारी दिपक पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधुन तसेच तात्काळ पत्रव्यवहाराचा पाठपुरवठा करूण शेतकर्यांना दिवसा तसेच सलग बारा तास विजपुरवठा सुरू करण्याच्या सुचना केल्या.
यावेळी श्री.रविंद्र पाटील श्री.के एस पाटील सोसायटी चेअरमण श्री सुनिल माने श्री सुनिल पंडीत श्री अरुण पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते.









