कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
कोल्हापूर
सध्या सायबर गुन्हेगारांकडून फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी जनजागृती प्रबोधनाच्या माध्यमातून अशा गुह्याची संख्या कमी केली आहे. तसेच ज्यांनी फसवणूक केली. त्यांच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत. गुन्हेगारांना शिक्षा लागावी यासाठी सरकारी वकीलांची बैठक घेतली. फिर्यादी फितूर होणार नाही. यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. कन्व्हेक्शन वाढवण्यासाठी आमचे सदैव प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, जिह्यातील कारखानदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस दलाकडून आणखी काही अपेक्षा आहेत का? याबाबत चर्चा केल्यानंतर वाहतूक कोंडी व भंगार चोरीचे प्रमाण वाढत असल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली आहे. याबाबत आपण पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून, तोडगा काढला जाणार आहे, असेही फुलारी यांनी सांगितले. ते म्हणाले, अत्याचाराच्या घटना या ओळखीच्या अथवा नात्यातील लोकांकडूनच घडण्याचे प्रमाण जास्त आहे. यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. शाळा, महाविद्यालयात जाऊन आमचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गुड टच, बॅड टच बाबत मुलांचे प्रबोधन करतात. मुला, मुलींच्या काही समस्या असतील तर त्या जाणून घेतल्या जातात. अशा प्रकारे हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका परप्रांतियाने हल्ला केला. अशा घटना कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिह्यात कोठे घडू नयेत. यासाठी परप्रांतियांना आश्रय देताना त्यांची माहिती घ्यावी. कारखाने अथवा इतर उद्योगात काम देतानाही त्यांची चौकशी करूनच, त्यांना कामावर ठेवून घ्यावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी केले आहे. भविष्यात परप्रांतियांकडून हल्ला होऊ नये, अथवा जरी तसा काही प्रकार घडला. तर संशयीतांना शोधणे सोपे व्हावे. यासाठी पोलीसांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते असेही त्यांनी सांगितले.
जुना राजवाडा पोलीस ठाणे हेरिटेज
कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे (ग्रामीण) व सोलापूर(ग्रामीण) या जिह्यातून उत्कृष्ठ पाच पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली. यामध्ये जिह्यातील इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा पहिला नंबर असून, शिरोळ पोलीस ठाणे पाचव्या स्थानावर आहे. तर कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे पोलीस ठाणे हेरिटेज असून, या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी हे पोलीस ठाणे चांगल्या प्रकारे सांभाळले असून, या पोलीस ठाण्याची देखणी वास्तू असल्याचा उल्लेख कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार बैठकी दरम्यान केला.
Previous Articleसर्वसामान्यांचा ‘लोकनाथ’ आजही लोकप्रिय
Next Article अंबाबाई मंदिरातर्फे गरजू रुग्णांना मदत मिळावी








