सम-विषम पार्किंगवर भर : कारवाईचा बडगा
बेळगाव : बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पोलीस दलाने प्रयत्न सुरू केले आहेत. खास करून पाविर्ढिंगला शिस्त लागली तरच वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. त्यामुळे सम-विषम पाविर्ढिंगवर भर देण्यात येत आहे. सोमवारी सकाळी बाजारपेठेत वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली. खडेबाजार, गणपत गल्ली, हंस टॉकीज रोड व रामलिंग खिंड गल्ली परिसरात सम-विषम पार्किंगला शिस्त लावण्यात आली होती. वाहनचालक रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. सम-विषम पार्किंगला पार्किंग संदर्भात फलक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, वाहतूक विभागाचे एसीपी गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून पार्किंगला शिस्त लावण्याची मोहीम हाती घेतली असून रस्त्याच्या एकाच बाजूला होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक सुरळीत होत आहे. नूतन पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनीही सूत्रे स्वीकारल्यानंतर वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यावर भर दिला आहे. वाहतूक विभागासाठी अतिरिक्त बळही पुरविण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील पार्किंग व वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम हाती घेतले आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांना कुलूप घालून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.









