मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
पणजी : गत जून महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाने बंद केलेली गोवा-गॅटविक नॉन-स्टॉप फ्लाईट पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापुजी यांना लिहिले आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाने सदर विमानसेवा 15 जुलै पासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता होती. तथापी अद्याप ती प्रारंभ झालेली नाही. गोव्यातील असंख्य लोक रोजगार किंवा अन्य उद्देशाने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र सदर सेवा बंद झाल्याने लंडनला जाणारे आणि तेथून परतणाऱ्या गोमंतकीयांना बरेच त्रास सहन करावे लागत आहेत.









