पोलीस उपायुक्त बरमणी यांनी स्वीकारला पदभार
बेळगाव : कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी सूत्रे स्वीकारली. शांत व सुरक्षित बेळगावसाठी आपले पहिले प्राधान्य असणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. रोहन जगदीश यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर गुरुवारी राज्य सरकारने एन. व्ही. बरमणी यांची नियुक्ती केली होती. शुक्रवारी दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शांत व सुरक्षित बेळगावसाठी आपले प्रयत्न असणार आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.









