भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( IFFI ) नुकताच संपन्न झाला. या महोत्सवातील ज्युरींमधील एकमेव भारतीय असलेले सुदिप्तो सेन (Sudipto Sen) यांनी “द काश्मीर फाइल्स” (Kashmir Files ) बद्दल नविन वक्तव्य केले आहे. इस्रायली चित्रपट निर्माते आणि महोत्सवाचे प्रमुख ज्युरी असलेले नदाव लॅपिड (Nadav Lapid ) यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली असून त्यांनी केलेले भाष्य हे त्यांचे वैयक्तिक मत होते, असे म्हटले आहे.
काही दिवसापुर्वी नदाव लॅपीड यांनी काश्मिऱ फाईल्स चित्रपटाबाबत केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावर अनेक काश्मिर फाईल्स समर्थकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांनी नादाव लॅपीड यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करून लॅपीड यांना विरोध केला.
त्यानंतर या गदारोळानंतर शिवसेना आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी लॅपीड यांच्या विधानाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता लॅपीड यांना आणखी तीन ज्युरींनी समर्थन दर्शवले असून त्यामध्ये अमेरिकन चित्रपट निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संपादक पास्केल चॅव्हन्स आणि फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्ममेकर जेव्हियर अँगुलो बार्चुरेन यांनी सुद्धा ट्विटरवर एक निवेदन जारी केले आहे. त्यानंतर सेनचे हे विधान आले. “जर कोणी सार्वजनिक ठिकाणी एखादा विशिष्ट चित्रपटा बाबत अपेक्षित नसलेले बोलले असेल तर ती त्याची वैयक्तिक भावना आहे. त्याच्या वैयक्तीक मताशी ज्युरी बोर्डाशी काहीही संबंध नाही,” असे सुदिप्तो सेन म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









