जैविक संपत्तीची प्रंचड हानी झाल्याने जंगली प्राणी लोकवस्तीत येण्याची भीती
वाळपई : गेल्या दहा दिवसांत सत्तरी तालुक्मयात विविध भागातील डोगरावर आगीच्या घटना घडल्या. यामुळे जैविक संपत्तीचे प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे. आगीमुळे ा डोंगरावरील हिरवळ जळून नष्ट झाल्यामुळे रानटी जनावरांची येणाऱ्या काळात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्मयता आहे. यामुळे खाद्यासाठी रानटी जनावरे लोकवस्तीमध्ये घुसण्याची शक्मयता आहे. बुधवारी सकाळी वाळपईपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या दाबोसे येथे रस्त्यावर गव्यांचा कळप दृष्टीस पडला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रानटी जनावरे शहरी भागातील लोकवस्तीच्या दिशेने येऊ लागल्यामुळे येणाऱ्या काळात यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढण्याची आहे. याबाबतची माहिती अशी की, गेल्या दहा दिवसांत सत्तरी तालुक्मयाच्या एकूण आठ ठिकाणी डोंगराला आग लागण्याच्या घटना घडल्या. यातून काजू बागायती मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या. त्याचप्रमाणे जैविक संपत्ती, जंगल संपत्ती, जैवविविधता धोक्मयात आलेली आहे. डोंगरावर व जंगलामध्ये उपलब्ध असलेली हिरवळ पूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यामुळे या डोंगरात वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांच्या खाद्यान्नावर याचा परिणाम झाला आहे. त्यांना हिरवळीचे खाद्य मिळणे दुरापास्त बनलेले आहे. दरम्यान, आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वेळूस दाबोस दरम्यानच्या पुलाच्या पलीकडे गव्या रेड्याचा मोठा कळप रस्ता ओलांडताना दिसला. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली. दाबोस गाव हा वाळपई शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. गव्यांचा वावर वाढला! दरम्यान, रस्त्यावर सातत्याने नागरिकांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे जवळपास 80 टक्के भागांमध्ये लोकवस्ती तयार झालेली आहे. या लोकवस्तीच्या नजीक आता गव्याचा यांचा कळप फिरू लागलेला आहे. यामुळे संबंधित परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी या गव्याचा कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे. दरम्यान, ठाणे पंचायत शेतातील गोळावली रिवे भागातही मोठ्या प्रमाणात गव्यांचा वावर वाढलेला आहे. यासंदर्भात नागरिकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सदर गवे सातत्याने काजूच्या बागायतीमध्ये निदर्शनास येतात. यामुळे काजू बागायतीत जाणाऱ्या नागरिकांना भीती निर्माण झालेली आहे.









