सेन्सेक्स 452 तर निफ्टी 132.70 अंकानी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी व सलग तिसरे सत्रही घसरणीसह बंद झाले आहे. यामध्ये सेन्सेक्स 452 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. यासोबचत निफ्टीही नुकसानीसह बंद झाला आहे. विविध क्षेत्रांपैकी आयटी क्षेत्र सर्वाधिक घसरणीत राहिले होते.
दिग्गज कंपन्यांमध्ये शुक्रवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 452.90 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 59,900.37 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 132.70 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 17,859.45 वर बंद झाला आहे. सलगचे तिसरे सत्र घसरणीत राहिले असून यामध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 26 समभाग हे घसरणीसोबत बंद झाले आहे. मुख्य कंपन्यांमध्ये जेएसडब्लू स्टील, टीसीएस, इंडसइंड बँक, बाजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, कोल इंडिया आणि कोटक बँकेसह निफ्टी 39 समभाग घसरणीत राहिले आहेत. याच्या विरुद्ध बाजूला ब्रिटानिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बीपीसीएल, ओएनजीसी, नेस्ले इंडिया, बजाज ऑटो आणि आयटीसी सह निफ्टीतील समभागांमध्ये तेजी राहिल्याची नेंद केली आहे.
आयटी नुकसानीत
राष्ट्रीय शेअर बाजारातील 11 क्षेत्रातील निर्देशांपैकी 10 क्षेत्र घसरणीत राहिले असून यामध्ये आयटी सर्वाधिक 2 टक्क्यांनी घसरले आहे. यासोबतच बँक, वाहन, फायनाशिअल सर्व्हिस, औषध, पीएसयू बँक, खासगी बँक, आणि रियल्टी मीडिया व धातू क्षेत्रही घसरुन बंद झाले. तर एफएमसीजी क्षेत्र फक्त तेजीसोबत बंद झाले आहे.
युक्रेन युद्धाचा प्रभाव ः गव्हर्नर दास
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम हा दक्षिण आशियाईमधील देशांवर झाला आहे. यामुळे महागाई वाढली, तसेच महागाई नियंत्रणात आणण्यात येणाऱया योजनांवरही मर्यादा निर्माण झाल्या असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या परिषदेत बोलताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.









