बऱ्याच वेळेला पोटदुखीवर ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटदुखी, गॅस यावर ओवा हा घरगुती रामबाण उपाय मानला जातो. याबरोबरच अनेक पदार्थांमध्ये ओव्याचा वापर केला जातो.पण याव्यतिरिक्त ओव्याचे उत्तम आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत,जे तुम्हाला माहितही नसतील. चला तर मग आज याच कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात.
ओव्याचे नियमित सेवन केल्याने हृदयाशी संबंधित रोगांसाठी ते फायदेशीर ठरते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.
मधुमेहावरही ओवा उपयुक्त ठरतो. ओव्याचा अर्क रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो.
सर्दी,पडसे झाले असेल तर भाजलेल्या ओव्यात काळे मीठ घालून चावून खावे. आणि वर कोमट पाणी प्यावे.यामुळे सर्दी झाली असल्यास लवकर आराम मिळतो.
ओवा दाहशामक असल्याने सांधेदुखीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याचबरोबर ओव्यात अॅन्टीबायोटिक घटक असल्याने त्वचेचे विकार, खाज येणे किंवा त्वचा लालसर होणे अशा समस्या कमी होण्यास मद्त होते.
निद्रानाशाचा त्रास असल्यास रात्रीच्या जेवणानंतर गरम पाण्यात सोबत ओवा खा. निद्रानाशाचा त्रास नाहीसा होईल. ओवा हे एक औषध आहे ज्याचे दुष्परिणाम होत नाहीत.
यामुळे रोजच्या आहारात ओव्याचा समावेश केल्याने याचा नक्कीच फायदा होतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









