प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस आयएमईआरतर्फे पहिल्या सेमिस्टरच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी सहय़ाद्री पर्वतरांगांच्या परिसरात शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. सहल 18 ते 20 मे दरम्यान होती. ‘अंडरस्टँडिंग मी’ अंतर्गत विद्यार्थ्यांना 3 दिवसांचे काटेकोर आणि कठीण प्रशिक्षण दिले गेले.
याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या वागण्यातील बदल, कार्यक्षमता अभ्यासण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले. या सहलीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, सामाजिक आणि मानसिक विकास, सांघिक वातावरणात स्वतःला घडवणे आणि नेतृत्वगुणांचा विकास साधण्यासाठी झाला.
या सहलीचे प्रमुख पी. जी. कोण्णूर यांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळय़ा उपक्रमांची योजन आखली. केएलएस आयएमईआरचे असोसिएट प्रोफेसर डॉ. अजय जमनानी यांनी सहलीचे आयोजन केले.









