बेळगाव: भाग्यनगर येथील भंडारी कन्नड शाळेच्या विद्यार्थिनी लक्ष्मी मल्लाडी आणि निर्मला मल्लाडी या दोघी सख्या बहिणी इयत्ता चौथी आणि नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी या आईचे छत्र हरविलेल्याने या मुलींचे शिक्षण शुल्क भरण्यास अडचण निर्माण झाली होती. याची माहिती संजीवीनी फौंडेशनच्या सल्लागार डॉ सुरेखा पोटे यांना समजली. त्यांनी आलायन्सच्या जागतिक सदस्या आणि जी जी चिटणीस स्कुलच्या मुख्याध्यापिका डॉ नविना शेट्टीगार व इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या कर्मचारी आरती सुभेदार यांनी या दोन्ही मुलींचे शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत केली आहे. यावेळी डॉ सुरेखा पोटे यांनी डॉ शेट्टीगार आणि सुभेदार यांचे आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









