Kolhapur News: सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना कोर्टाने तीन नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले होते. आज कोर्टासमोर त्यांना उभा केले असता. कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली.
ACB च्या जाळ्यात सापडलेल्या लोहार यांच्या घराची झाडाझडती कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज घेतली. काल (ता. 31 नोव्हेंबर) रात्री 10 वाजल्यापासून ते आज दुपारी 3 वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र यामध्ये लोहार यांच्या घरात कोणतीही रोख रक्कम आढळून आली नाही. तसेच स्थावर मालमत्तेचा अहवाल आज सोलापूर लाचलुचपत विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त अधिकारी म्हणून लोहार यांच्यावर शिक्का मारण्यात आला. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द तर चांगलीच गाजली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले. शिवाय अनेक गंभीर तक्रारीवरूनच त्यांना जिल्हा परिषदेमधून एकतर्फी कार्यमुक्त केले. मात्र पुढे ते मॅटमध्ये गेले. लोहार यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृह एकदा बंद पडले होते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









