बेळगाव: बेळगाव मधील शैक्षणिक संस्थानिकांनी आज कर्नाटकाचे शिक्षण मंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेतली.शैक्षणिक अडचणीं सोडवण्याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्री बी सी नागेश यांनी अडचणींचा पाठपुरावा करून, त्या तात्काळ सोडवू व लवकरात लवकर सुधारणा घडवून आणू असे आश्वासन दिले.यावेळी बेळगाव कर्नाटक ओबीसी मोर्चाचे सचिव व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव,मुक्तार पठाण, प्रोफेसर गाडगीळ व इतर उपस्थित होते.
Previous Articleगुलाम नबी आझाद यांना भारत जोडोचे निमंत्रण; घरवापसीची शक्यता?
Next Article माकडांना मिळते विशेष वेतन









