सावंतवाडी । प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी रामेश्वर प्लाझा येथील भाजपच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, गजानन गावडे, युवराज लखमराजे भोसले, माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, दत्तू नार्वेकर ,नीता सावंत- कविटकर, जितू गावकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी ,अजय गोंदावळे, राजू बेग ,शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,चंद्रकांत जाधव, मधु देसाई आदी उपस्थित होते.









